मधुमेहींनी धाप, थकवा दुर्लक्षित करू नये; हृदयविकाराचे असू शकतात संकेत

नवी मुंबई : मधुमेह हा केवळ रक्तातील साखरेशी संबंधित आजार नसून तो हृदयाच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम करू शकतो. मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या अधिक असतो. मात्र, धाप लागणे, सतत थकवा जाणवणे, व्यायाम किंवा शारीरिक ...

admin
admin Chief Editor
Jun 27, 2026 • 1:17 PM  6  0
जीवनशैली
NEWS CARD
Logo
मधुमेहींनी धाप, थकवा दुर्लक्षित करू नये; हृदयविकाराचे असू शकतात संकेत
“मधुमेहींनी धाप, थकवा दुर्लक्षित करू नये; हृदयविकाराचे असू शकतात संकेत”
Favicon
Read more on maharashtrahorizon.com
27 Jun 2026
https://www.maharashtrahorizon.com/lifestyle/dont-overlook-diabetes-fatigue-signs-of-cardiovascular-disease
Copied
मधुमेहींनी धाप, थकवा दुर्लक्षित करू नये; हृदयविकाराचे असू शकतात संकेत

नवी मुंबई : मधुमेह हा केवळ रक्तातील साखरेशी संबंधित आजार नसून तो हृदयाच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम करू शकतो. मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या अधिक असतो. मात्र, धाप लागणे, सतत थकवा जाणवणे, व्यायाम किंवा शारीरिक हालचाल करण्याची क्षमता कमी होणे, छातीत सौम्य अस्वस्थता यांसारखी लक्षणे अनेकदा वाढते वय, ताणतणाव किंवा व्यस्त जीवनशैलीचा परिणाम समजून दुर्लक्षित केली जातात. त्यामुळे ही लक्षणे गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयाचे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. ब्रजेश कुंवर यांनी सांगितले की, मधुमेहामुळे कालांतराने रक्तवाहिन्यांचे नुकसान होते आणि कोरोनरी आर्टरी डिसीजचा वेग वाढतो. त्यामुळे हृदयाशी संबंधित गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो. अनेक मधुमेही रुग्ण रक्तातील साखर नियंत्रणावर लक्ष केंद्रित करतात; मात्र हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. विशेषतः दीर्घकाळ मधुमेह असलेल्या रुग्णांनी धाप लागणे, कारण नसताना थकवा जाणवणे, व्यायाम करण्याची क्षमता कमी होणे किंवा छातीत सौम्य वेदना अथवा अस्वस्थता यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

तज्ज्ञांच्या मते, मधुमेहामुळे कालांतराने कोरोनरी धमन्या अरुंद व कडक होतात. अनेक रुग्णांमध्ये धमन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शियमयुक्त कठीण अडथळे निर्माण होतात. अशा अडथळ्यांमुळे उपचार अधिक गुंतागुंतीचे होतात आणि वेळेत उपचार न झाल्यास गंभीर हृदयविकाराचा झटका किंवा अन्य हृदयविकाराचा धोका वाढतो.

इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीमधील आधुनिक तंत्रज्ञानामुळे अशा गुंतागुंतीच्या रुग्णांवर उपचार अधिक प्रभावी आणि सुरक्षितपणे करणे शक्य झाले आहे. कॅल्शियम मॉडिफिकेशन तंत्रज्ञान, प्रगत इमेजिंग तंत्र आणि आधुनिक स्टेंट प्लॅटफॉर्मच्या मदतीने कॅल्शियमयुक्त कठीण अडथळ्यांवर अधिक अचूक उपचार करता येत असून उपचार प्रक्रियेतील गुंतागुंत कमी होऊन रुग्णांचे परिणाम अधिक चांगले मिळत आहेत.

"आधुनिक तांत्रिक प्रगतीमुळे कोरोनरी आर्टरी डिसीजच्या गुंतागुंतीच्या रुग्णांवरील उपचारांमध्ये मोठा बदल झाला आहे. प्रगत कॅल्शियम मॉडिफिकेशन तंत्र आणि अचूक उपचार नियोजनामुळे कठीण अडथळ्यांवर अधिक प्रभावी उपचार करून रुग्णांचे परिणाम सुधारता येत आहेत," असे डॉ. कुंवर यांनी सांगितले.

हृदयरोगतज्ज्ञांनी मधुमेही रुग्णांना सतत थकवा, धाप लागणे, शारीरिक क्षमता कमी होणे किंवा हालचालीदरम्यान अस्वस्थता यांसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे. वेळेत निदान आणि उपचार केल्यास गंभीर गुंतागुंत टाळून दीर्घकालीन हृदयाचे आरोग्य चांगले राखता येते.

रक्तातील साखरेची नियमित तपासणी करण्याबरोबरच हृदयाची वेळोवेळी तपासणी, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणे, नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि नियमित आरोग्य तपासणी यांचा मधुमेह व्यवस्थापनात समावेश असणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

भारतात मधुमेह आणि हृदयविकार या दोन्हींचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही आजारांमधील परस्परसंबंधाबाबत जनजागृती होणे आवश्यक असून, नागरिकांनी रक्तातील साखरेबरोबरच हृदयाच्या आरोग्यालाही तितकेच महत्त्व द्यावे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

rss_feed Disclaimer
Story published through syndicated feed.
favorite Follow us for the latest updates:

admin Chief Editor

Digital Archives

Follow Us

Recommended Posts

amp_stories Web Stories
login Login
local_fire_department Trending menu Menu