८५० मुलांच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया सुनील गावस्कर झाले भावुक; रोटरी क्लबच्या ‘गिफ्ट ऑफ लाइफ’ उपक्रमातून गरीब मुलांवर मोफत हृदयशस्त्रक्रिया
मुंबई : जन्मजात हृदयविकार असलेल्या चिमुरड्यांना नवे आयुष्य देण्याच्या उदात्त हेतूने राबवण्यात आलेल्या ‘गिफ्ट ऑफ लाईफ’ मोहिमेंतर्गत तब्बल ८५० हून अधिक वंचित मुलांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या. या भावनिक आणि कौतुकास्...
मुंबई : जन्मजात हृदयविकार असलेल्या चिमुरड्यांना नवे आयुष्य देण्याच्या उदात्त हेतूने राबवण्यात आलेल्या ‘गिफ्ट ऑफ लाईफ’ मोहिमेंतर्गत तब्बल ८५० हून अधिक वंचित मुलांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या. या भावनिक आणि कौतुकास्पद सोहळ्याला भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी विशेष उपस्थिती लावली होती. जुहू तारा रोड येथील रोटरी सेवा केंद्रात आयोजित या कार्यक्रमात सुनील गावस्कर यांनी शस्त्रक्रिया झालेल्या चिमुरड्यांशी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधत त्यांचा उत्साह वाढवला.