नवोदित कलाकारांना मिळाले मोठे व्यासपीठ! सिनेमॅजिक एंटरटेनमेंटची हिंदी वेबसीरिज ‘मुखौटा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
सिनेमॅजिक एंटरटेनमेंटच्या हिंदी वेबसीरिज ‘मुखौटा’चे पोस्टर रिलीज झाले. संतोष पांचाळ दिग्दर्शित या सीरिजमध्ये नवोदित कलाकार आहेत. कलाकार आणि टीमची संपूर्ण माहिती वाचा.
मुंबई : नवोदित कलाकारांना अभिनयाची संधी आणि आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सिनेमॅजिक एंटरटेनमेंटची आगामी हिंदी वेबसीरिज ‘मुखौटा’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरिजचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.